Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आढावा बैठकीत आ. चंद्रकांत पाटलांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शासकीय कामांसाठी नागरीक व शेतकऱ्यांना फिरवणाऱ्या अधिकाऱ्यांची आमदार चंद्रकांत पाटील यांनी चांगलीच खरडपट्टी काढून धारेवर धरल्याचे आढावा बैठकीत पहायला मिळाले. सर्वसाधारण लोकांना शासकीय कार्यालयाच्या चकरा मारायला लाऊ नका तात्काळ यांचे कामे मार्गे लावण्याच्या सूचना दिल्या. रावेर तालुक्यातील  आढावा बैठकीत देण्यात आले. यावेळी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

रावेर शहरातील कमलाबाई गर्ल्स हायस्कूल मध्ये रावेर तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्या संदर्भात प्रशासकीय आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण जनता तसेच शेतकरी प्रशासकीय बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यामध्ये घरकुल घेणारे गरीब लाभार्थीना वाळू मोफत द्यावे, घरकुल योजनेचा आढावा, गोठा योजना संदर्भात वाढलेल्या तक्रारी, अपंग निधी खर्च संदर्भात तपशील, पीएम किसान योजनेला येणाऱ्या अडचणी, रस्ते संदर्भात तक्रारी, रेशन धान्य योजनेच्या समस्या, उतारे नावावर न लावण्याच्या तक्रारी या आढावा बैठकीत मांडण्यात आल्या. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोडवण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी तहसिलदार बंडू कापसे, भाजपा जिल्हा निवडणूक प्रभारी नंदकिशोर महाजन, सजंय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष छोटु पाटील, पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, नायब तहसिलदार सजंय तायडे, सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समिती प्रभारी गट विकास अधिकारी प्रविण शिंदे, जिल्हा परिषद उपविभागीय अधिकारी श्री इंगळे, वनक्षेत्रपाल अजय बावणे, बस आगार प्रमुख, कृषी विभाग,महावितरण अधिकारी, भूमी अभिलेख अधिकारी यांच्यासह तालुक्यातील महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version