Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. सावकारे यांचा गावागावात प्रचार दौरा (व्हिडीओ)

sanjay savakare

 

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ विधानसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना, आरपीआय, रासप महायुतीचे उमेदवार आ. संजय सावकारे यांनी आज जाडगाव, मन्यारखेडा, फुलगाव, फुलगाव कॉलनी, तपत कठोरा, अंजनसोडे, सावतर, टाकळी, काहूरखेळा आदी परिसरात प्रचार दौरा केला. यावेळी आ. सावकारे यांनी आगामी पाच वर्षात शहरातील रस्ते, गटारी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्याचप्रमाणे ग्रामीण भागात शेती सिंचन व शेत रस्त्यांच्या प्रश्नास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही मतदारांना दिली.

गेल्या पाच वर्षात आ. सावकारे यांनी शहरासह तालुक्यात पाच सबस्टेशन केल्यामुळे तालुक्यातील लोड सेटिंग बंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात प्रत्येक गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे केली असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विकास कामांच्या बळावर नागरिकांनी त्यांच्या प्रचारफेरी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन प्रचारात मोठा सहभाग नोंदवला.

या प्रचार रॅलीप्रसंगी तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चौधरी, सुनील महाजन, ज्ञानदेव झोपे, कठोरा येथील सरपंच प्रशांत पाटील, शेतकी संघाचे संचालक प्रशांत निकम, कृउबा समितीचे माजी सभापती सोपान भारंबे, खडका येथील सरपंच संजय पाटील, भैया महाजन, दीपक भिरूड, चुडामन भोळे, वरणगाव येथील नगरसेवक गणेश धनगर, साकरी येथील मनोहर सपकाळे, किन्ही येथील ए.टी.चौधरी, पंचायत समिती उपसभापती वंदना उन्हाळे, भालचंद पाटील, उल्हास बोरोले, गुरुजित्सिंग चाहेल, राजू साबळे, फुलगाव येथील सरपंच वैशाली टेकोडे, उपसरपंच राजेंद्र चौधरी, ललित भोळे, नारायण जांभळे, तपत कठोरा येथील सरपंच उज्वला कोळी, जितु कोळी, सोमा कोळी, सुनील कोळी, भोजराज पाटील, पितांबर पाटील, येथील सरपंच रामराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र कोळी, संतोष कोळी, किरण कोळी, देवा कोळी, राजेंद्र तायडे, अतुल पाटील, टाकळी येथील सरपंच प्रमोद चौधरी, उपसरपंच किशोर तायडे, मनोहर महाजन, प्रमोद पाटील, विनोद पाटील, महेश पाटील, काहूरखेडा येथील सरपंच दिलीप वराडे, नंदू वराडे, नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख आखलाक, नगरसेविका माला मेढे, मेहनजबी इरफान पिंजारी, साजिद कुरेशी, इरफान पिंजारी, हाजी अल्लउद्दीन सेठ, सहकारमित्र चंद्रकांत बढे, सुनील माळी भाजपा शहरध्यक्ष, शामराव धनगर, नारायन सेठ जैस्वाल, प्रवीण ढवळे, नगरसेवक गणेश धनगर, नटराज चौधरी, आकाश निमकर, तेजस जैन, हितेश चौधरी, शेख फहिम शेख अल्लउद्दीन, प्रदीप भंगाळे, प्रमोद सरोदे, डी.के.खाटीक, रामदास माळी, संदिप माळी, धीरज माळी, महेश माळी, रामू माळी, सचिन माळी, कुंदन माळी, लखन माळी, शेख जावेद, शेख युसुफ, शंकर पवार, रमेश पालवे, सुधाकर पोळ, रमेश माळी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे या प्रचार रॅलीमध्ये तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

आ. सावकारे यांचे गावातील महिलांनी औक्षण करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. तर सावकारे यांनीही गावागावातील हनुमान मंदिर, श्रीराम मंदिर यासह विविध मंदिरात जाऊन देवादिकांचे दर्शन घेत विजयाचे साकडे घातले.

पहा : प्रचार दौराचे काही क्षण

Exit mobile version