Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. किशोर पाटलांनी दिले विद्यार्थ्यांना “स्पर्धा परीक्षा सारथी” पुस्तक भेट

पाचोरा -लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथे नूतन वास्तू उद्घाटन सोहळा व सत्कार समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आ.किशोर पाटील यांनी येथील स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रा. राजेंद्र चिंचोले लिखित “स्पर्धा परीक्षा सारथी” पुस्तक भेट देण्यात आली.

या कार्यक्रमास माजी आमदार दिलीप वाघ, खासदार उमेश पाटील यांच्या सुविद्य पत्नी संपदा पाटील, दिपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन, पाचोर्‍याचे प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, जि. प. सदस्य मधुकर काटे, रत्नप्रभा पाटील, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष देविदास महाजन, रवींद्र जाधव, प्रा. राजेंद्र चिंचोले, प्राचार्य प्रमोद महाजन, पी. एस. पाटील, एस. टी. गीते, शालिग्राम मालकर, नितीन तावडे, उद्धव मराठे, डॉ. भरत पाटील, ग्राम विकास मंडळाचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. पुस्तक वितरण कार्यक्रमाचे नियोजन गजु पाटील, प्रा. प्रशांत चौधरी, मिलिंद पाटील यांनी केले.

 

Exit mobile version