Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. मिटकरी यांच्यावर गुन्हे दाखल करा; पुरोहित मंडळाची मागणी (व्हिडीओ)

जळगाव, – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा पुरोहित मंडळाच्यावतीने मंगळवार २६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येवून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांनी १९ एप्रिल रोजी सांगली येथे एका कार्यक्रमात बोलताना हिंदू धर्माचे विवाह पद्धती बद्दल चुकीचे मंत्र म्हणून पुरोहित वर्गाची टिंगल टवाळकी करत जे अकलेचे तारे तोडले. अश्या अज्ञानी माणसाच्या अशा वक्तव्यावर महाराष्ट्र राज्याचे मंत्री जयंत पाटील व धनंजय मुंडे हे दोघे ज्याप्रमाणे खळखळून हसत होते. असे वक्तव्य व अशा मंत्र्यांच्या हसण्याच्या कृतीवरून दोन जातीत तेढ निर्माण होऊन हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर कडक कारवाई करून कायदेशीरित्या गुन्हे दाखल करावे अशी मागणीचे निवेदन जळगाव जिल्हा पुरोहीत मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.

 

निवेदन देतांना  यावेळी अध्यक्ष भूषण मुळे, सचिव अजय जोशी, उपाध्यक्ष पुरूषोत्तम शुक्ल, सहसचिव विजय जोशी, कोषाध्यक्ष अविकुमार जोशी, दीपक भट, योगेश्वर जोशी, राजाभाऊ जोशी, साखरे गुरुजी, गजानन फळे,  चेतन शर्मा, पवन तिवारी, अंकुर देशपाडे, मुकुंदा जोशी, चंद्रकांत जोशी, हेमंत जोशी, निखील पंडीत, प्रदीप जोशी, देवेंद्र साखरे, वैभव नाईक, कल्पेश पांडे, योगेश जोशी, देवा काळे यांच्यासह आंदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Exit mobile version