Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. एकनाथराव खडसे यांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा ।  माजी मंत्री तथा नुकतेच विधान परिषदेवर निवडून गेलेले आमदार एकनाथराव खडसे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

 

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विजय संपादित केला होता. आमदारकीचा शपथविधी झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र मध्येच राज्यात सत्तांतर झाल्यामुळे तूर्तास त्यांना मंत्रिपद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर एकनाथराव खडसे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये राज्यातील स्थापन झालेले सरकार हे अल्पजीवी ठरणार असल्याचा दावा केला होता. राज्यात लवकरच मध्यवादी निवडणुका लागू शकतात असे देखील ते म्हणाले होते.

 

या पार्श्वभूमीवर आज एकनाथराव खडसे यांनी राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चेचा तपशील समोर आला नाही.

Exit mobile version