आ. मंगेश चव्हाण यांच्या हस्ते पेव्हर ब्लॉकचे उद्घाटन

चाळीसगाव प्रतिनिधी । विश्व मानव रुहाणी केंद्र चाळीसगावच्या १८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पेंव्हर ब्लॉकचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला असून आमदार मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून व फीत कापून सदर पेव्हर ब्लॉकचे उद्घाटन करण्यात आले.

विश्व मानव रुहाणी केंद्र येथे ४ महिन्यांपूर्वी आ.मंगेश चव्हाण यांनी केंद्रातील भाविकांच्या मागणीच्या अनुषंगाने विश्व मानव रुहाणी केंद्र येथील आवारात पेंव्हर ब्लॉकच्या कामाचे भूमिपूजन केले होते. आमदार स्थानिक विकास निधीतून चारच महिन्यात सदर काम पूर्ण झाले. सदर कार्यक्रमास उपस्थित राज्य निगारण कमिटी अध्यक्ष गणेश धनगर यांनी मनोगतातुन आमदारांचे आभार मानले. खरचं आपण फक्त आमदार नसून समाजाचे सेवक आहात व आपण दिलेला शब्द पूर्ण केला, त्याबद्दल आम्ही सर्व आपले आभारी आहोत. अशी भावना सर्व सत्संग भक्त परिवाराच्या वतीने व्यक्त केली.

आमदार मंगेश चव्हाण यांनी मनोगतात सांगितले की, अध्यात्मिक व वारकरी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात वाढल्याने समाजात असणाऱ्या सर्व धार्मिक संप्रदाय याविषयी नेहमीच आपुलकी वाटत आली आहे. आपल्या निधीच्या माध्यमातून धार्मिक केंद्रांसाठी सोयीं सुविधा उपलब्ध करून देता येत असल्याने तो निधी खऱ्या अर्थाने सत्कारनी लागत असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. प्रस्तावना करत असताना दीपक चौधरी यांनी सांगितले की, वारकरी पुत्र मंगेश दादा यांनी माझ्या आई वडिलांना पंढरपूरला घेऊन जात विठ्ठल रुखमाई यांचे दर्शन घडवून आणले. माझी आई मला पंढरपूरहून परत आल्यानंतर म्हणाली, मंगेश दादांनी आमची पंढरपूर येथे आमच्या मुलांप्रमाणेच सेवा केली व हे ती आजही नेहमीच कौतुकाने सर्वाना सांगत असते असा अनुभव त्यांन  उपस्थितांना सांगितला.

यावेळी लीगल कमिटी प्रमुख किशोर अहिरराव, निगारण कमिटी राज्य सदस्य राजेश भोयर, कासार साहेब, बापू सोनवणे, सुनील सोनार, माजी नगराध्यक्ष डी.आर.चौधरी, नगरसेवक रविंद्र चौधरी, देसले नाना, एमएसइबी उपकार्यकरी अभियंता विनोद बाविस्कर, कैलास पाटील, जितेंद्र रवींद्र पाटील, आनंद कोळी, अतुल पाटील, चेतन पाटील, दामू पाटील, रमेश चौधरी, भगवान चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन पाटील यांनी केले. प्रस्तावना दीपक चौधरी यांनी  तर आभार गौरव माने यांनी मानले.

 

 

Protected Content