Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. चिमणराव पाटील यांचे अंगरक्षक व कार्यालयीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

पारोळा प्रतिनिधी । पारोळा येथील आमदार कार्यालयातील आमदार चिमणराव पाटील यांचे अंगरक्षक व कार्यालयीन कर्मचारी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह  आलेली आहे.

गेल्या १ महिन्यापासुन पारोळा व एरंडोल तालुक्यात रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच दिनांक १३ मार्च रोजी पारोळा येथील आमदार कार्यालयातील आमदार चिमणराव पाटील यांचे अंगरक्षक व कार्यालयीन कर्मचारी यांची कोरोना चाचणी पाॕझिटिव्ह आलेली आहे. त्यामुळे आमदार चिमणराव पाटील यांनी होमकाॕरंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आमदार पाटील यांनी गेल्या २ दिवसात आमदार कार्यालयात ज्यांनी भेट दिली असेल किंवा जे माझ्याशी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा संपर्कात आलेले असतील त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन केलेले आहे. 

तसेच पुढील काही दिवसांसाठी आमदार कार्यालय बंद करण्यात आलेले आहे याची कृपया नोंद घ्यावी व आपण आपल्या कामकाजाच्या बाबतीत माझ्याशी किंवा स्वियसहाय्यकांशी फोनवर संपर्क साधावा अशा सुचना केलेल्या आहेत.

एरंडोल विधानसभा मतदारसंघातील जनतेला कृपया प्रशासनाने लावलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करा, मास्कचा नियमित वापर करा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा, आवश्यक असल्यास बाहेर पडा, आपली व आपल्या कुटुंंबाची योग्य ती काळजी घ्या, वेळो-वेळी हात धुवा, सॕनिटायझरचा वापर करा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका सुरक्षित राहा मास्क वापरा सुरक्षित अंतर ठेवा असे आवाहन,आमदार चिमणराव पाटील यांनी केलेले आहे.

 

 

 

Exit mobile version