Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. चव्हाण यांनी घेतली वारकरी कुटुंबियांची जबाबदारी !

चाळीसगाव प्रतिनिधी । सोमनाथ महाराज नाईकवाडे हातगावकर यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून ५० हजार व मुलीचे लग्न होईपर्यंत १० हजार रुपये वार्षिक मदत करण्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जाहीर केले आहे.

सोमनाथ महाराज नाईकवाडे हातगावकर यांचे निधन झाले आहे. वारकरी कुटुंब संकटात असताना चक्क वारकर्याचा मुलगा आ. मंगेश चव्हाण हा धावून आला आहे. सोमनाथ महाराज नाईकवाडे यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत व मुलीचे लग्न होईपर्यंत दरवर्षी १० हजार रुपये देण्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जाहीर केले आहे. ह.भ.प. सोमनाथ महाराज नाईकवाडे, हातगावकर यांचे निधन ही चाळीसगाव तालुक्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची हानी आहे.  मी देखील वारकऱ्याचा मुलगा आहे. संकटात असणाऱ्या वारकरी कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही. असे विधान आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी यावेळी बोलताना केले. या मदतीबद्दल वारकरीपुत्र आमदार मंगेश चव्हाण यांचे समस्त वारकरी बांधवांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले गेले.

 

Exit mobile version