Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमीपुजन

यावल प्रतिनिधी । येथील चोपडा मतदारसंघाच्या आ. लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांसाठी भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आ.प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते विकास कामांचा वाघझीरा तालुका यावल येथे शासकीय आश्रम शाळा दुरुस्ती तसेच खावटी अनुदान वाटप तसेच दोनगाव  येथे स्मशानभुमी बांधणे, चिंचोली येथे संरक्षण भिंत बांधणे, शिरागड येथे पेवर ब्लॉक बसवणे ईचखेडा येथे पेवर ब्लॉक बसवणे अशा विविध विकास कामांचे भुमीपुजन करण्यात आले. दरग्यान यावल तहसील कार्यालयामध्ये आ. लताताई सोनवणे व तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते तथा निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख यावल रविंद्र सोनवणे, युवा सेना तालुका प्रमुख गोटू सोनवणे यांच्या उपस्थित दारिद्रय रेषेखालील कुटुंबप्रमुख  निराधार महिलांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत यावल तालुक्यातीत चोपडा मतदारसंघातील अलका पाटील , दहीगाव, ज्योती पाटील, उंटावद , नुसरत दगडु तडवी रा . किनगाव बू॥ , सरलाबाई जिजाबराव पाटील रा . गिरडगाव ,सुंनदा पाटील रा .थोरगव्हाण, सखुबाई मेहतरे रा . मनवेल , भिकुबाई भिल रा . दगडी आणी वंदना कोळी रा . डांभूर्णी या ८ महीलांना प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे अर्थसहायचे धनादेश वाटप करण्यात आले.

तसेच रेशन कार्ड , विद्यार्थ्यांना शैक्षणीक कार्यासाठी उत्पन्नाचे दाखले वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित हो.ते उपतालुकाप्रमुख आडगाव योगेश पाटील उपतालुकाप्रमुख मनवेल विनायक पाटील, उपतालुकाप्रमुख पप्पू जोशी, यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, युवासेना शहर प्रमुख सागर देवांग, शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे तालुका संघटक अजहर खाटीक,  रोहिदास महाजन किनगाव मनोहर पाटील, सरपंच गिरडगाव, प्रताप सोनवणे सरपंच शिरागड, मोहन कोळी सरपंच पिंपरी, भरत चौधरी चुंचाळे, भरत राजपूत बोराळे, प्रदीप वानखेडे, विकी वानखेडे बोराळे, निलेश साळुंखे चिंचोली सूर्यभान पाटील डोणगाव ,आदिवासी तालुका संघटक भारसिंग तेरसिंग बारेला वाघझिरा, दिनेश साळुंके चिंचोली, सुधाकर आबा वाघोदा, मनोहर पाटील गिरडगाव ,अण्णा कोळी डांभुर्णी, अशोक पाटील थोरगव्हाण, समाधान कोळी थोरगव्हाण ,पिंटू साळुंके शिरागड, हेमंत पाटील नायगाव ,प्रकाश कोळी दहिगाव ,अविनाश पाटील, इस्‍माईल तडवी सावखेडा सिम, बबलू कोळी किनगाव ,भरत पाटील कोरपावली, आशिष झुरकाडे महेलखेडी, गोकुळ कोळी, विनायक कोळी मनवेल ,जितू खंबायत मोहराळा ग्रामपंचायत सदस्य, विरावली नथूभाऊ उपशहर प्रमुख यावल किरण बारी, मोहसीन खान ,विजय पंडित, पिंटू कुंभार, गणेश कोळी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या सर्व उपस्थितांचे आभार निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांनी मानले.

 

Exit mobile version