Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. भोळे यांच्या कार्यालयास भूषणसिंग होळकर यांची भेट

rajumama

जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी.आय(A) रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती, महायुतीचे उमेदवार व शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्या संपर्क कार्यालयास आज (दि.७) सकाळी ११ वाजता भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष्य मा. भूषणसिंग होळकर (अहिल्याबाई होळकर घराणे इंदोर) यांनी भेट दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली. लवकरच शहरामध्ये धनगर समाजाच्या लोकांशी भेटून ओबोसी समाजाचे मेळावे आयोजित करणार असल्याचं आ. भोळे यांना या भेटीप्रसंगी सांगितले. आपले काम अतिशय चांगले असून केंद्र व राज्य सरकारने ओबीसी व धनगर समाजासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आपणसुद्धा ओबोसी समाजाचे नेतृत्व करणारे आमदार असून शहराच्या सर्वसामान्य जनतेशी आपले नाते सलोख्याचे आहेत. केलेले काम अतिशय प्रशंसनीय असल्याचे देखील म्हटले. या भेटीवेळी त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी दिलीप माने, माजी नगरसेवक शेगाव, अशोक रिटे पाटील, शहरी इतिहास संशोधन केंद्र सभासद, सुभाष सोनवणे यांच्यासह आदि उपस्थित होते.

Exit mobile version