Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात कोम्बिंग ऑपरेशन !

भुसावळ प्रतिनिधी । शहरात गुन्हेगारीत वाढ झाल्यामुळे अखेर गुन्हे शाखा रस्त्यावर उतरली आहे. नुकतेच भुसावळ शहरामध्ये बाजारपेठ पोलीस स्टेशन, भुसावळ शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस विभागाकडून कोम्बिंगला सुरुवात करण्यात आली आहे. येथील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली.

सदर कोम्बिंग ऑपरेशन मध्ये संपूर्ण शहरांमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार गुन्हेगार, पकड वारंट मधील गुन्हेगार स्टँडिंग वॉरंट त्याचप्रमाणे हिस्ट्री शीटर व अन्य विविध गुन्हेगार चेक करण्यात आले. त्यासाठी संपूर्ण शहरात एकंदरीत चार टीम तयार करण्यात आलेल्या होत्या. त्याशिवाय RCP पथक देखील या कामी वापरण्यात आलेले होते. रात्री नऊ वाजता कोंबिंग ऑपरेशन ला सुरुवात करण्यात आली व पहाटे तीन वाजता सदरची कारवाई थांबवण्यात आली.

सध्या स्थिती मध्ये सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारांवर निगराणी ठेवण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे नागरिकांच्या मालमत्तेच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून सदरचे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले आहे.

 दरम्यान खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

1)पाहीजे आरोपी अटक-02 ( 19 आरोपी चेक केले )
2) स्टॅन्डींग वॉरंट बजावनी-01
3) बेलेबल वॉरंट बजावनी-07
4) नॉनबेलेबल वॉरंट बजावनी-02
5) तडीपार 8 चेक केले. एक मिळून आला.BP Act.142 – 01
5)प्रोव्ही केस-02( गु.रंं.नं.144/2021 महा.दा.बंदी का कलम ६५(ई) प्रमाणे.एकुण मुद्देमाल 22,464 /- किं.च्या.देशी दारुच्या 432 बाटल्या.)
6) हिस्ट्री शीटर्स 19 चेक केले. 13 घरी मिळाले.
7) summonबजावणी – 34
8) MV act cases – 28
यापुढेही भुसावळ शहरांमध्ये गुन्हेगारीवर वचक ठेवण्याच्या दृष्टीने अचानकपणे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येणार आहे.

Exit mobile version