Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हाधिकारी, आ. भोळे, महापौर व ललित कोल्हे यांनी केले मतदान (व्हिडीओ)

WhatsApp Image 2019 10 21 at 12.28.11 PM

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव विधानसभा मतदारसंघात आज शहराच्या प्रथम नागरिक महापौर सीमा भोळे व आ. राजुमामा भोळे यांनी प्रताप नगर येथील सौ. रत्ना जैन प्राथमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज सकाळी ७.०० वाजता सुरु करण्यात आली. मतदान केल्यानंतर आ. भोळे यांनी सांगितले की, मतदान हे श्रेष्ठ दान असून स्वतःच्या, शहरच्या, राज्याच्या व देशाच्या विकासासाठी सर्व मतदारांनी मतदान करून आपला हक्क बजावावा. आज निसर्गाने साथ दिली, परमेश्वराने कृपा केली, चिखल झाला व चिखलात पुन्हा कमळ फुलेल असा विश्वास आ. भोळे यांनी व्यक्त केला.जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडतोय, तरीही मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले. त्यांनीही आज सकाळी गुरुनानक सतसंग हॉल येथे त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदार केंद्राची पाहणीही केली. सकाळी या मतदान केंद्रावर शुकशुकाट होता.महापालिकेतील भारतीय जनता पार्टीचे सभागृह नेते ललित कोल्हे यांनी शिव कॉलनीतील सरस्वती विद्यामंदिर व प्राथमिक शाळा येथे मतदान केले. त्यांनीही नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचे आवाहन केले.

Exit mobile version