Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्या सकाळी ११ वाजता होणार सामूहिक राष्ट्रगान

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीताचे आयोजन केले असून याचा शासन निर्णय अर्थात जीआर जाहीर करण्यात आला आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १७ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सामूहिक राष्ट्रगीत होणार आहे.   या सामूहिक राष्ट्रगायनात राज्यातील खासगी, शासकीय तसेच इतर सर्व शाळा महाविद्यालय शिक्षनिक संस्था विद्यापीठ मधील शिक्षक विद्यार्थी सहभाग असणार आहे.  राज्य सरकारकडून याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे. खासगी आस्थापना व्यापारी प्रतिष्ठाने संस्था ह्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहनही राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे.

सामूहिक राष्ट्रगीत गायनासंदर्भात राज्य शासनाने सविस्तर शासन निर्णय जारी केला आहे. देशभक्ती, देशप्रेम आणि आपली उज्वल परंपरा जपण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आपण राबवत आहोत. नागरिकांच्या मनात आपला राष्ट्रध्वज आणि आपले राष्ट्रगीत याविषयी पवित्र भावना आहेच, त्याच पवित्र भावनेला सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून जगाच्या समोर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हती सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी दिली आहे. यामुळे उद्या प्रत्येक नागरिकाने असेल तिथेच थांबून सामूहिक राष्ट्रगीत गान करायचे आहे.

Exit mobile version