Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अश्‍लील चाळे करणारा क्लास चालक गजाआड

यावल प्रतिनिधी । शहरातील न्यु-व्यास नगरातील खाजगी शिकवणी घेणार्‍या वर्गचालकाकडून १२ वर्षीय बालीकेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली असुन, या नराधमाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील न्यु-व्यास नगरात अभिषेक छेदीलाल पाल हा आर्क फाउंडेशन नावाने खाजगी शिकवण्या क्लासेस घेतो. त्याच्या शिकवणी क्लासेसमध्ये शहरातील १२ वर्षीय बालीका येथे शिकवणीसाठी जाते. १८ सप्टेबर शिकवणी वर्गात संशयीत आरोपी पाल याने बालीकेशी वेळोवेळी लज्जास्पद वर्तन केले असल्याचे पिडीत बालीकेच्या आईच्या निर्दश्श्‍नास आले. अधिक तपासाअंती गेल्या दोन महीन्यात वेळोवेळी हा शिक्षक बालीकेशी लज्जास्पद वर्तन करीत असल्याचे समोर आले. अखेर शनिवारी पिडीत बालीकेच्या आईने येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादितवरून पाल विरूध्द बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, उपनिरीक्षक सुनिता कोळपकर, संजय तायडे करीत आहे.

Exit mobile version