Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुगार अड्डा बंद करा, अन्यथा रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहराबाहेरील महावीर पार्क शेजारील घरात सर्रासपणे दिवस-रात्र अवैधरीत्या पत्त्याचे जुगार अड्डे बिनधास्तपणे सुरू असून ते तातडीने बंद करा व संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराचे निवेदन पोलीसांना देण्यात आले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पत्त्याचा जुगार एका राजकीय पक्षाच्या दोन ते तीन नगरसेवक मिळून चालवीत आहेत. याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी उपविभागीय अधिकारी सौरभ अग्रवाल यांनी छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जमा करत 40 ते 50 लोकांवर कारवाई केली होती.

दोन ते तीन दिवसांपासून नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॉलनी परिसरातील त्या जुगार अड्ड्यावर गावातील 17 ते 24 वर्षातील तरुण मुलांची वर्दळ वाढलेली आहे,पत्ते खेळायला तरुण मुलांची गर्दी व्हायला पाहिजे म्हणून दारू, मटण, सिगारेट इत्यादी सह अन्य आमिषे दिले जात आहे. त्यामुळे शहरातील तरुण पिढी व्यसनाधीन होऊन त्यांचे भविष्य खराब करण्याचे काम या दोन ते तीन लोकप्रतिनिधी मार्फत सूरु आहे.यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागणी आहे की महावीर पार्क शेजारील घरामध्ये सुरू असलेला पत्त्याचा क्लब तात्काळ बंद करावा व संबंधितावर कारवाई करावी अन्यथा भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.सदरील निवेदन धरणगाव पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार यांना देण्यात आले

त्याच बरोबर तक्रार अर्जाच्या प्रति पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, पोलीस अधीक्षक जळगाव, उपविभागीय अधिकारी चोपडा या वरिष्ठ अधिकारी वर्गाला देण्यात आलेल्या आहेत.त्याप्रसंगी भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड संजयभाऊ महाजन,ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, सुनिल चौधरी, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, युवा मोर्चा अध्यक्ष भूषण धनगर इत्यादी पदाधिकारी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते.

Exit mobile version