Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कायमची बंद करा बारामती – अंजली दमानिया

anjali damniya

 

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ आज बारामती बंदची हाक पुकारण्यात आली. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खिल्ली उडवत म्हणाल्या, ठेवा तुमची बारामती कायमची बंद ! कोणाला काय फरक पडतो,’ अशी टिका त्यांनी ट्विटव्दारे केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनाल यांना सर्वच पक्षातील अनेक नेत्यांसह शरद पवारांवर गुन्हा दाखल केला आहे. पवारांचा या बँकेशी काहीही संबंध नसताना त्यांचे नाव घोटाळ्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी ‘बारामती बंद’ची हाक दिली आहे. दमानिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यावर टीका केली आहे. ‘हा सगळा किळसवाणा प्रकार आहे. चोर तो चोर, वर शिरजोर… बारामती कायमची बंद राहिली तरी कुणाला फरक पडत नाही?, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, ‘तुम्ही बारामतीपुरतेच मर्यादित आहात हे दाखवून दिलंत,’ असाही टोलाही दमानिया यांनी पवारांना हाणला आहे.

Exit mobile version