Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

“स्वच्छताही सेवा” या मोहिमे अंतर्गत विद्यापीठात स्वच्छता मोहीम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  “स्वच्छताही सेवा” या मोहिमे अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी रविवार १ ऑक्टोबर रोजी बांभोरी आणि विद्यापीठ परीसरात श्रमदान केले. या मोहिमेचे नेतृत्व कुलगुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छताही सेवा ही मोहिम राबविण्याचे आवाहन देशवासींयांना केले होते.  त्या मोहिमेला प्रतिसाद देत रविवारी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्यावतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी,  प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बांभोरी परिसरात शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांनी स्वच्छता केली.  विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता करण्यात आली. विद्यापीठाच्या रासेयो कार्यालयाजवळून रासेया संचालक प्रा.सचिन नांद्रे यांच्या नेतृत्चाखाली स्वच्छतेचे महत्व दर्शविणारे फलक घेऊन बांभोरी पर्यंत विद्यार्थ्यांनी रॅली काढली.

सुमारे एक तास हे अभियान राबविण्यात आले.  यामध्ये विद्यापीठाच्या विविध विभागांमधील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया उत्साहाने सहभागी झाले होते.  यावेळी बांभोरीचे सरपंच सचिन बिऱ्हाडे, ग्राम विकास अधिकारी रमेश देवरे आणि ग्राम पंचायत सदस्य संदीप कोळी, इत्यादी उपस्थित होते. बांभोरी येथे या मोहिमेअंतर्गत व्यसनमुक्ती बाबतचे पथनाट्य विनोद ढगे व त्यांच्या सहकार्यांनी सादर केले. यावेळी समाज कल्याण उपायुक्त योगेश पाटील उपस्थित होते.

Exit mobile version