अमळनेर व चाळीसगावात कोरोनाचा स्फोट; जिल्ह्यात ४९८ नवीन बाधीत रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये अमळनेरात एकाच दिवशी ८२ तर चाळीसगावात ७५ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. तर आज जिल्ह्यात दिवसभरात ४९८ बाधीत आढळून आले आहेत.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ४९८ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक ८२ रूग्ण हे अमळनेरात आढळून आले आहेत. याच्या खालोखाल चाळीसगाव तालुक्यात ७५ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.

उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-४९; जळगाव ग्रामीण-१६; भुसावळ-१७; चोपडा-४४; पाचोरा-१५; भडगाव-५३; धरणगाव-२६; यावल-९; एरंडोल-४०; जामनेर-१७; रावेर-१७; पारोळा-३२; चाळीसगाव-७५; मुक्ताईनगर-०; बोदवड-० व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ६ असे रूग्ण आढळून आले आहेत.

आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या १९०८२ इतकी झालेली आहे. अर्थात आजवरच्या बाधीतांच्या संख्येने १९ हजारांचा आकडा पार केला आहे. यातील १३१७६ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ४०२ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ७ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ६७८ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ५२२८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content