Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

२१ सप्टेंबर पासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग होणार सुरू; अटींचे पालन आवश्यक

school 1

नवी दिल्ली । केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ९वी ते १२वीपर्यंत अंशतः शाळा सुरू करण्यासंदर्भात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) जारी केली आहे. यानुसार आता २१ सप्टेंबरपासून शाळां सुरू व्हायला सुरुवात होईल. मात्र, यासाठी काही अटींचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंगळवारी रात्री ९ वी ते १२वी पर्यंतच्या शिक्षणाला सुरू करण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) जाहीर केली आहे. यानुसार येत्या २१ सप्टेंबरपासून ९वी ते १२वीचे वर्ग सुरू होतील. मंत्रालयाने म्हटले की, शाळा आणि कॉलेज शिक्षण सुरू करण्याचा निर्णय स्वतः घेऊ शकतील. परंतू, क्लासेस वेगवेगळ्या टाइम स्लॉटमध्ये भरवले जातील आणि कोरोनाची लक्षणे असलेल्या विद्यार्थ्याला शाळेत येऊ दिले जाणार नाही.

नियमांचे पालन सर्वांना करावे लागेल

शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचार्‍यांना सहा फुटांचे अंतर ठेवावे लागेल. तसेच, सतत हात धुणे, मास्क लावणे आणि सरकारने घालुन दिलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे लागेल.

या आहेत गाइडलाइन्स

शाळेत क्लासेस सुरू होण्यासोबतच ऑनलाइन आणि डिस्टेंस लर्निंगदेखील सुरू ठेवावी लागेल.
शाळेत ९वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या इच्छेने शाळेत येण्याची परवानगी आहे.
शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांची लिखीत परवानगी घ्यावी लागेल.
फक्त कंटेन्मेंट झोनच्या बाहेरील शाळा सुरू होतील.
शाळा सुरू होण्यापूर्वी दररोज सर्व परिसर सॅनिटाइज करावा लागेल.
५०% टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफला ऑनलाइन टीचिंग आणि टेली काउंसिंलिंगसाठी शाळेत बोलवले जाईल.
विद्यार्थ्यांसाठी बायोमीट्रिक अटेंडेंसऐवजी कॉन्टॅक्टलेस अटेंडेंसची व्यवस्था करावी लागेल.
विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये सहा फुटांचे अंतर असणे अनिवार्य आहे.
सभा, स्पोर्ट्स अ‍ॅक्टिविटी आणि इतर इव्हेंट होणार नाहीत.
जिमचा वापर केला जाऊ शकेल, परंतू स्वीमिंग पूल बंद राहतील.
शिक्षक, कर्मचार्‍यांना फेस मास्क, हँड सॅनिटाइजर उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असेल.

Exit mobile version