Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुप्रिम कॉलनीत दोन गटात तुफान हाणामारी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनी परिसरातील सागर अपार्टमेंटजवळ कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. यामध्ये दोन वाहनांचे दगडफेकीत नुकसान झाले असून शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता सात जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील सुप्रिम कॉलनीतील सागर आपर्टमेंटजवळ दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाली. हा वाद वाढतच असल्याने त्या दोन्ही गटाकडून एकमेकांना मारहाण केल्यानंतर त्यांनी तेथील दगड उचलून दोन दुचाकींचे नुकसान केले. याप्रकरणी दत्तात्र्य शरद कोळी (वय-१९), गोपाळ संभाजी पाटील (वय-१९, दोघ. रा. सुप्रिम कॉलनी), सचिन प्रभाकर सोनवणे (वय १८, रा. खुबचंद साहित्या नगर), राकेश कैलास पाटील (वय २३, रा. नितीन साहित्या नगर), सैय्यद अब्दुल रहिम अली मोहम्मद अली (वय २४, रा. मारुळ ता. यावल) कैसीम शेख शाकीर शेख (वय २५, रा. नशेमन कॉलनी) यांच्यासह एक विधी संघर्षीत बालक असे एकुण सात जणांविरुद्ध शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी हे करीत आहे.

Exit mobile version