Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात दोन गटात तुफान हाणामारी; परस्परविरोधात गुन्हे दाखल

भुसावळ- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील रेल्वे शाळेजवळ दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारण्याच्या रागातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात दोन्ही गटातील एकुण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील रेल्वे शाळेजवळ रविवारी २४ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजत‍ा विकास गोरखा आणि अनवर फय्याज मिर्झा दोन्ही रा. कवाडे नगर यांच्या दुचाकीचा कट लागल्यावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांत हाणामारीत झाले. यात एकमेकांना लोखंडी सळई आणि फायटरने मारहाण झाली. यामुळे भुसावळ शहरात थोडावेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दोन्ही गटातर्फे भुसावळ शहर पोलीसात एकमेकांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पहिलेल्या तक्रारीत रेखा दिपक म्यांद्रे वय ४४ रा. कवाडे नगर, भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनवर मिर्झा, लखन, प्रज्ञा शिंदे, समीर, अजय शिंदे, आनंद शिंदे, दिपक शिंदे आणि अमिना मिर्झा (पुर्ण नाव माहित नाही सर्व रा. कवाडे नगर, भुसावळ ) या ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसऱ्या तक्रारीत अनवर फय्याज मिर्झा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विकास गोरखा, रेखा म्यांद्रे, अदित्य कुमावत, तुषार म्यांद्रे, भावना म्यांद्रे आणि दिपक म्यांद्रे सर्व रा. कवाडे नगर, भुसावळ या ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुढील तपास सहा्य्यक फौजदार मोहम्मद अली सैय्यद आणि पोहेकॉ संजय सोनवणे हे करीत आहे.

Exit mobile version