Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरकोळ कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील चोरवड गावात सुरू असलेल्या भांडणाबाबात विचारणा केल्याच्या रागातून दोन कुटुंबांतील सदस्यांना लोखंडी रॉडने एकमेकांना मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा परस्पर विरोधात एकुण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील चोरवड गावात नातेवाईकांसोबत सुरू असलेले भांडणाविषयी विचारपूर केल्याच्या कारणावरून गावातील पाटील आणि ठाकरे कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता घडली. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या घटनेबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या सदस्यांनी एकमेकांविरोधात तक्रार दिली आहे. यात मनोज विजयसिंग पाटील यांनी दिलेल्या पहिल्या फिर्यादीवरून कृष्णा दगडू ठाकरे, दगडू लटकन ठाकरे आणि नंदू दगडू ठाकरे सर्व रा. चोरवड ता. भुसावळ यांच्या विरोधात बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसऱ्या तक्रारीत नंद दगडू ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन दगडूसिंग पाटील, मनोज विजयसिंग पाटील, विजयसिंग विठ्ठलसिंग पाटील सर्व रा. चोरवड ता. भुसावळ यांच्याविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोहेकॉ गणेश राठोड हे करीत आहे.

Exit mobile version