Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फेसबुकच्या माध्यमातून शहरवासीयांनी अनुभवला ‘शून्य सावली क्षण’

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव शहरवासीयांनी आज ‘शून्य सावली क्षण’ या अदभूत घटनेचा अनुभव फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दुपारी १२.२४ मिनिटांनी घेतला.

दैनंदिन जीवनात आपण नेहमी म्हणतो की रोज १२ वाजता सूर्य आपल्या डोक्यावर येतो. पण रोज तसे घडत नाही कारण सूर्य वर्षातून फक्त दोनच वेळेस आपल्या डोक्यावर येतो. सौर घड्याळानुसार किंवा स्थानिक वेळेनुसार १२ वाजता व हातातील घड्याळानुसार (भारतीय प्रमाण वेळ) १२ वाजून काही मिनिटांनी डोक्यावर येतो. आणि आपली सावली इकडे तिकडे न पडता पायापाशी पडते.

निसर्गाच्या या अदभूत घटनेला ‘शून्य सावली दिवस’ किंवा ‘झीरो शडो डे’ असे म्हटले जाते. आणि संपूर्ण दिवस सावली आपल्या पायाखाली नसते. १२ वाजून काही मिनिटांची जी वेळ असते त्या क्षणाला प्रत्येक सरळ उभ्या असलेल्या वस्तूची सावली त्याच्या पायापाशी पडते. म्हणून याला शून्य सावली दिवस ऐवजी ‘शून्य सावलीचा क्षण’ असलेला दिवस आज जळगाव शहरवासीयांनी अनुभव घेतला.
जळगाव खगोलप्रेमी ग्रुपच्या वतीने खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी फेसबुकच्या माध्यमातून शून्य सावली क्षणाचा अनुभव दिला. यावेळी जळगाव खगोलप्रेमी ग्रुपने तयार केलेले क्षैतिज, इक्वेटोरियलआणि आर्मिलरी सनडायल असे तीन सौर घड्याळ (सनडायल) ही ठेवण्यात आले होते. ते वेळ कशी दाखवतात व हातातील घड्याळ आणि सौर घड्याळ यांच्या वेळेत फरक का असतो ? याच फारकामुळे हातातील घडाळ्याप्रमाणे शून्य सावली क्षण १२ वाजून २४ मिनिटांनी आणि सौर घड्याळाप्रमाणे १२ वाजता होण्यामागील विज्ञान प्रात्यक्षिकाव्दारे खगोलप्रेमींनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समजून घेतले.
यावेळी खगोल अभ्यासक अमोघ जोशी, किरण वंजारी, रेवती वंजारी, श्रेया चौरासिया, नेहा चौरासिया, भारती भंडारी उपस्थित होते.

Exit mobile version