Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर येथे प्रांताधिकारी कार्यालयाच्या जागेसाठी नागरिकांची एकजूट

faizpur meeting

फैजपूर, प्रतिनिधी | येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासाठी शहरात शासकीय जागा मिळत नसल्याने आज शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांची बैठक घेण्यात आली. यावेळी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येवून शहरात उपलब्ध असलेल्या जागांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

यावल व रावेर तालुक्याचा मानबिंदु असलेले उपविभागीय अधिकारी कार्यालय (प्रांत कार्यालय) हे गेल्या सात वर्षांपूर्वी राज्य शासनाने फैजपुर येथे मंजूर केले होते. या कार्यालयाला येथील पालिकेने जागा उपलब्ध करून दिली असून याठिकाणी हे कार्यालय सध्या कार्यरत आहे. मात्र या कार्यालयाला शहरात शासकीय जागा मिळत नसल्याने ते सावदा येथे नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या कार्यालयामुळे यावल-रावेर तालुक्यातील विदयार्थी व नागरिकांची मोठी सोय झाली आहे. फैजपुर शहराचा मानबिंदु असलेल्या या कार्यालयासाठी जागेला पर्याय शोधण्यासाठी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरीक यांची एक बैठक आज (दि.३०) संध्याकाळी ५.०० वाजता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झाली. त्यावेळी हे कार्यालय फैजपूर येथेच रहावे, यासाठी शहरातील तलाठी कार्यालय, बस्थानक मागील दक्षिणेकडील जागा, वनविभागाची जागा, नगरपालिका मालकीची गट नं १४२७, या जागा उपलब्ध असल्याने त्या वापरण्यात याव्या, यासंदर्भात राज्य शासन, खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी व जिल्हाधिकारी यांना उद्याच निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यासाठी गरज वाटल्यास आंदोलनही करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

यावेळी जिल्हा दूध संचालक हेमराज चौधरी, माजी नगराध्यक्ष पी.के. चौधरी, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार, माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, नगरसेवक देवेंद्र साळी, सातपुडा अर्बन व्हाईस चेअरमन चंद्रशेखर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र होले, मनु टेलर, काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज, भाजपा शहर अध्यक्ष संजू रल, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष अन्वर खाटीक, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शेख शाकिर,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्ष अशोक भालेराव, हाडवैध रघुनाथ कुंभार, युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्र कार्याध्यक्ष मुदस्सर नजर, राजाभाऊ चौधरी यांचासह सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Exit mobile version