Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नांदेड येथे अधिकाऱ्यांकडून पूर पाहणी

7a6386f3 0bb4 48c3 a59b 3d681941a97f

धरणगाव , प्रतिनिधी | तालुक्यातील नांदेड येथे एरंडोलचे प्रांतधिकारी विनय गोसावी आणि धरणगाव बीडीओ स्नेहा कुडचे यांनी गिरणा नदीची पूरपाहाणी केली. ग्रामपंचायत बैठकीनंतर गुलाबवाडीतील नागरिकांच्या विनंतीवरून बीडीओ कुडचे यांनी गुलाबवाडीची पाहणी केली असता, तेथील अत्यंत वाईट परिस्थिती दिसली.

 

येथील ६० घरांना अजूनही रस्ता नाही. गटारीतून चालत जावे लागते. पाणीपुरवठ्याचे नळ गटारीत बुडालेले विदारक चित्र दिसले. या कुटुंबांना मागील ३० वर्षापासून जिल्हा परिषदेने सुविधा नाकारल्या. कारण हा भाग पाणबुडीत ,पूरग्रस्त क्षेत्रात आहे. पुनर्वसन खात्याने ही यांचे पर्यायी जागेवर पुनर्वसन केले नाही. पुनर्वसन ही नाही, सुविधा ही नाही, अशी बिकट कात्रीत सापडलेले लोक जळगाव जिल्हा जागृत जनमंच चे शिवराम पाटील यांच्याकडे मदतीची मागणी केली.डिसेंबर २०१८ मधे १० दिवस झेडपी समोर उपोषण केल्यावर नांदेड ग्रामपंचायत मालकीची ३० गटाची ७२ हेक्टर जमीन पैकी एक गट नंबर ३६८ हा ग्रामपंचायतने दिला. त्याची परवानगी जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळाली. पण ग्रामपंचायतीने मोजणी फी भरून देखील भूमिअभिलेख खात्याने अद्यापही मोजणी न केल्याने घरकुल जागेचे अलौटमेंट अडकलेले आहे. शिवराम पाटील यांनी बीडीओ, तहसीलदार,जिल्हाधिकारी (महसूल) यांच्याकडे पाठपुरावा केला. परंतु, अद्यापही काहीएक हालचाल नाही.

 

 

भूमिअभिलेखचे कर्मचारी मी नोकरीवर नाही, मी रजेवर आहे. साहेब नाहीत अशी कारणे सांगून वेळ मारून नेत आहेत. आता नवीन बीडीओ कुडचे आणि नवीन प्रांत गोसावी यांनी पूरग्रस्तांना आश्वासन दिले की, ताबडतोब जागेची मोजणी करून घरकूलसाठी जागा अलौटमेंट करू. दरम्यान, यावेळी डॉ. धर्मेश पालवे यांनी सांगितले की, ३० वर्षापासून चिखल तुडवत ही कुटुंबे कसेतरी युगाडा, केनिया, सोमालियाचे जीवन जगत आहेत. येथील झेडपी सदस्य कोणतीही मदत करीत नाहीत. आम्ही ही फुकट मत दिले नाही, म्हणून बोलता येत नाही. तीन वेळा निवडून दिलेले आमदार महोदय,फक्त आश्वासनाची पोटली आणून दाखवतात. कधी आमदार, कधी बीडीओ, कधी कलेक्टर ,कधी सीईओ यांचेकडे सतत फिरून ” चिलम तमाखू उस घर “असा खेळ चालू आहे. “देश आगे जा रहा है “या नरेंद्र मोदींच्या शब्दावर विश्वास ठेवून जीवन आणि मरण यातील खाईत गुलाबवाडीतील बायामाणसे झोके खात आहेत. जीवनाचा दोर तुटून जाईपर्यंत,अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

Exit mobile version