Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निकृष्ट दर्जाच्या महामार्गावरील धाप्यांमुळे नागरिक संतप्त

साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्ग सहावे लगत साकेगावजवळ दोन ते तीन दिवसातच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने साकेगाव ते वांजोळा जाणाऱ्या रस्त्यावर धापे टाकून झाले होते, मात्र ही टाकी इतकी निकृष्ट होते की ते दोन ते तीन दिवसातच दाते तुटले.

त्यामुळे साकेगाव येथून मोठा संताप व्यक्त होत आहे. एकीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ता निर्माण कार्यासाठी लाखो रुपये खर्च करतात, तर दुसरीकडे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. रात्री अपरात्री या धाप्यावरून गेल्यास अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येते नाही.  याला जबाबदार कोण असा असा संतप्त प्रश्न साखरमाण्यांमधून होत आहे.

तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जर असे काम करत असेल तर महामार्ग प्राधिकरणाच्या कामाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तरी लवकरात लवकर हे धापे उत्कृष्ट दर्जाचे बनावे जेणेकरून तुटणार नाही व अपघात होणार नाही याची महामार्ग प्राधिकरणाने गंभीर दाखल घ्यावी. अन्यथा कुणाची काही वाईट बरे वाईट झाल्यास सर्व गोष्टीला महामार्ग प्राधिकरण जबाबदार असेल असा प्रश्न साकेगाव वासीयांनी उपस्थित केला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असे निकृष्ट दर्जाचे काम का करते ? असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. हे इतके मोठे धापे यात बैलाचा पाय गेल्यास बैलगाडीला सुद्धा मोठी दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी लवकरात लवकर दाप्याचे काम करावे अशी मागणीसाठी साकेगाव वासीयांकडून होत आहे.

Exit mobile version