Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्टॉक नसूनही लसीकरण कशासाठी ? : सिरमचा सरकारला प्रश्‍न

मुंबई प्रतिनिधी । लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसतांनाही केंद्र सरकारने लसीकरणास कशासाठी प्रारंभ केला ? असा प्रश्‍न सिरम इन्स्टीट्युने आज व्यक्त केला आहे.

सीरम इन्स्टीट्युट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी एका कार्यक्रमात बोलतांना थेट केंद्रावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, लसीकरण सुरू करताना व्हॅक्सिनचा उपलब्ध स्टॉक आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईन्सकडे लक्ष दिलं गेलं नाही. स्टॉक नसल्याचं माहीत असूनही लसीकरण मोहीम राबवण्यात आली.

लसीकरण सुरू झाल्यानंतर आम्ही टार्गेटपर्यंत पोहोचतच होतो. तेव्हा सरकारने 45 वर्षांवरील आणि नंतर 18 वर्षांवरील लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडे लसीचा एवढा स्टॉक नाहीये हे सरकारला माहीत होतं. तरीही त्यांनी हा निर्णय घेतला. यातून उत्पादनाची उलब्धता पाहिली पाहिजे आणि न्यायसंगत पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे, हे आपल्याला शिकायला मिळते, असंही ते म्हणाले. लसीकरण सुरू झाल्यानंतर आम्ही टार्गेटपर्यंत पोहोचतच होतो. तेव्हा सरकारने 45 वर्षांवरील आणि नंतर 18 वर्षांवरील लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडे लसीचा एवढा स्टॉक नाहीये हे सरकारला माहीत होतं. तरीही त्यांनी हा निर्णय घेतला.

Exit mobile version