खंडणीखोरांना पोलीसांनी सिनेस्टाईल पकडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निमखेडी शिवारातील साईविहार कॉलनीत २९ जून रोजी मध्यरात्री अंगणात लावलेल्या दोन कार पेटवून देत १० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन जणांना जळगाव तालुका पोलीसांनी मंगळवारी १२ जुलै रोजी दुपारी यावल शहरातून सीनेस्टाईल व सापळा रचून अटक केली आहे. दोघांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश रमेश लहासे रा. पहूर ता. जामनेर आणि राजू समाधान कोळी रा. गोदरी ता. जामनेर अशी अटक केलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, निमखेडी शिवारातील साई विहार येथील रहिवाशी हरीश वरूडकर यांची कार क्रमांक (एमएच २० डीजे ७३१६) व आनंद युवराज पाटील यांची कार क्रमांक (एमएच १९ सीझेड ४४३०) या दोघांच्या कार घरासमोरील अंगणात लावलेल्या होत्या. बुधवारी २९ जून रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पार्किंगला लावलेल्या दोन्ही कार पेटवून दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाहनांना आग लावून जाळपोळ करणाऱ्यांनी चिठ्ठी लिहून १० लाख रूपयांची मागणी केली होत.  चिठ्ठीच्या खाली सुलतान भाई गब्बर गँग असा उल्लेख केला आहे. त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

या गुन्ह्याचा शोध सुरू असतांना ६ जुलै रेाजी पुन्हा अज्ञात व्यक्तीने व्हॉटसॲपच्या माध्यमातून १० लाखांऐवजी १५ लाखांची मागणी करत कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ११ जुलै रोजी पुन्हा मॅसेज करून एकाच्या घरात भाडेकरू सुरेश रमेश लहासे रा. पहूर ता. जामनेर राहत असलेल्या व्यक्तीकडे मोबाईल देण्यास  सांगितले. त्यावरून पोलीसांना संशय बळावला. दरम्यान, सांगिलेल्यानुसार फिर्यादी यांनी लहासे याला नवीन मोबाईल देण्यात आला. त्यानुसार पोलीसांनी कारवाईला सुरूवात केली. मंगळवारी १२ जुलै रेाजी सकाळी अज्ञात व्यक्तीने  सुरेश लहासे याला मोबाईल घेवून यावल येथे येण्यास सांगितले. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचला. सुरेश लहासे हा अजिंठा चौकात (एमएच २० ईजे ५९४२) कारमध्ये एकासोबत बसलेला पोलीसांना दिसून आला. पोलीसांनी कारचा पाठलाग करून यावल येथे गाठले. यावल येथील पंचायत समितीच्या आवारात गाडी लावलेली दिसून आली. पोलीसांनी सापळा रचून संशयित आरोपी सुरेश रमेश लहासे रा. पहूर ता. जामनेर आणि राजू समाधान कोळी रा. गोदरी ता. जामनेर यांना अटक केली.

 

Protected Content