Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चुंचाळे ग्रामपंचायततर्फे थोर पुरुषांना आदरांजली

यावल प्रतिनिधी । अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यावलचे तालुका अध्यक्ष फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली चुंचाळे ग्रांमपंचायततर्फे सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांच्याहस्ते राघोजी भांगरे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी थोर पुरूषांच्या प्रतिमेचे पूजन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे यावल तालुका अध्यक्ष फिरोज तडवी, ग्राम पंचायत सदस्य सुकलाल पाटील, रहिमान तडवी, रोजगार सेवक दीपक कोळी, भीम आर्मी जळगाव जिल्हा सचिव सुपडू सदाशिव, कुर्बान तडवी, इरफान तडवी, सिकंदर तडवी, इसा तडवी, शाहरुख तडवी, लतिफ तडवी, रशीद तडवी, मुकद्दर तडवी, जावेद तडवी, दामू पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते. तसेच फिरोज तडवी व संघटनेतर्फे चुंचाळे ग्रामपंचायतेला राघोजी भांगरे यांची प्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी आदिवासी विकास परिषदच्या सर्व पदाधिकारी व चुंचाळे ग्रामपंचायत अथक परिश्रम घेतले.

Exit mobile version