Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात नाताळ उत्साहात साजरा

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  | पांडे डेअरी चौक येथील डॉ. ॲन्ड रेव्ह. फ्रेड विल्यम शिलँडर मेमोरियल अलायन्यस चर्च जळगाव येथे ख्रिस्ती बांधवाचा नाताळ उत्साहात साजरा झाला.सदर चर्च हे जळगांव शहरातील सर्वात जूने चर्च आहे. या चर्च ची स्थापना १९२५ मध्ये झालेली आहे. पांडे डेअरी चौकात असलेल्या या चर्चची नवीन वास्तू १९९८ मध्ये बांधण्यात आली असून सध्या सुमारे ३५० सभासद आहेत. सदर चर्च हे शतकाकडे वाटचाल करीत आहे. या चर्चची जबाबदारी रेव्हरंट शशिकात एम. वळवी हे सांभाळत आहे.

आज दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता धर्मगुरु रेव्हरंट शशिकात एम. वळवी यांच्या उपस्थितीत प्रार्थना व उपासनेस सुरुवात झाली. सुरुवातीस ख्रिस्ती बांधवांनी ख्रिसमस कॅरर्ल्स म्हणजेच नाताळ गीते गायली. यात प्रामुख्याने युवकसंघ व लहान बालके यांचा सहभाग होता. त्यानंतर बायबल वाचन करण्यात आले. विश्वशांती, जागतीक शांतता व जागतीक युध्द यातून सवं मानवजातीचा बचाव व्हावा साठी प्रार्थना करण्यात आली.

सदर प्रसंगी रेव्हरंट. शशिकात एम. वळवी यांनी आपल्या प्रवचनात सांगीतले की येश शांतीचा अधिपती होता. सुमारे दोन हजार वर्षा पूर्वी सर्व मानवजातीस शांती मिळावी व तारण प्राप्त व्हावे यासाठी बेथलेहेम गावी गोठ्यात येशूचा जन्म झाला होता. येशूची शिकवण ही सर्व मानवासाठी आहे. त्याच्या शिकवणी नुसार आचरण केल्यास मनाला शांती मिळते.

आज कुटुंबाला, समाजाला व राष्ट्राला शांतीची गरज आहे. येशूने जगात शांतता नांदावी म्हणून या भूतलावर जन्म घेतला तो शांतीदूत होता, मनुष्याला पापापासून मुक्त करण्यासाठी व जगाला प्रेम, दया, क्षमा व शांतीची शिकवण देण्यासाठी येशू या जगात आला होता. येशूच्या शिकवणीमुळे शांती व तारण हे प्राप्त होणार आहे, म्हणून आज सर्वानी आपल्या अंतःकरणत, हृदयात येशूला स्थान देवून खरी शांती व तारण प्राप्त करावे असा संदेश त्यानी आपल्या प्रवचनातून केला.

उपासनेनंतर सर्व ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. सदर नाताळ प्रार्थना सभेत जळगांव शहरातील ख्रिस्ती समाज बहूसंख्येने उपस्थित होते. नाताळ उत्सव यशस्वी पणे संपन्न होण्यासाठी सचिव प्रा. विनय गायकवाड, पचं सदस्य प्रकाश शिंदे, एस.बी. गावीत, बेंजामीन मकासरे, बथुवेल नाईक, संजय पारधनी,  एलिझबेथ वळवी आदी मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्मीता पारधनी, पवन गवांदे, संदीप कसोटे, रेवती कसोटे प्रणाली बनसोडे, तसेच युवक संघ व संडे स्कुल आणि महिला संघाचे प्रमुख यांचे सहकार्य लाभले.

आज दिनांक २५ डिसेंबर रोजी नाताळ निमित्त रेडक्रॉस तर्फ डॉ. अपर्णा मकासरे यांच्या प्रयत्नातून रक्तदान शिबीर चर्च आवारात सुरु करण्यात आले आहे. अनेकांना त्याचा लाभ घ्यावा असे अवाहान रेव्हरेट शशिकांत वळवी व चर्च पंच कमिटी तर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version