Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशिराबादला गोळीबारासह चॉपरने हल्ला: एक ठार, एक गंभीर

जळगाव प्रतिनिधी । खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळाल्यानंतर विरुद्ध बाजूच्या टोळक्‍याने आज नशिराबाद जवळ गोळीबार आणि चॉपर हल्ला केल्याने एक जण ठार झाला असून एक जखमी झाला आहे यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, आज सायंकाळी सहाच्या सुमारास नशिराबाद येथील उड्डाण पुलाच्या खालील बाजूस दुचाकीस्वारांवर गोळीबारासह चॉपरने हल्ला करण्यात आला. यातील तरूण जागीच ठार झाला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. याची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या हल्ल्यात धम्मप्रिय मनोहर सुरळकर ( वय २०) याचा मृत्यू झाला असून त्याचे वडील मनोहर सुरळकर जखमी झाले आहेत. खून झाल्यानंतर केलेल्या चौकशीत याला पूर्व वैमनस्याची किनार असल्याचे दिसून आले.

भुसावळ येथील कैफ शेख जाकीर या तरुणाचा ११ ऑक्टोबर २०२० रोजी खून झाला होता. या खून प्रकरणात धम्मप्रिया मनोहर सुरळकर याला अटक करण्यात आली होती. सुमारे अकरा महिन्यापासून तो जळगाव कारागृहात होता. आज धम्मप्रिया याचा जामीन न्यायालयाने मंजुर केला. त्याचे वडील मनोहर आत्माराम सुरळकर हे मुलास घेण्यासाठी जळगावला गेले होते. सायंकाळी हे पिता-पुत्र भुसावळकडे येण्यासाठी निघाले.

नशिराबाद उड्डाणपुलाच्या खालील बाजूस हे बाप-लेक आले असतांना एका टोळक्याने त्यांना अडवून त्यांच्यावर हल्ला केला. याप्रसंगी झालेल्या गोळीबारात धम्मप्रिय हा जागीच ठार झाला. तर त्याचे वडील मनोहर सुरळकर हे गंभीर जखमी झाले. भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली आहे.

Exit mobile version