Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरूणावर चॉपर हल्ला करणारे दोघे अटकेत

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथे जुन्यावादातून संतोष सुभाष कोळी (वय-२२) तरूणावर ७ फेब्रुवारी चॉपरने जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोघांना जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतून एमआयडसी पोलीसांनी अटक केली आहे.  

राहुल रामचंद्र बऱ्हाटे (वय-३२) आणि निलेश उर्फ बाबा संजय अहिराव दोघे रा. रामेश्वर कॉलनी अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, संतोष सुभाष कोळी (वय-२२) रा. आयटीआय जवळ कुसुंबा ता.जि.जळगाव हा ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता त्याचा गावातील मित्र सागर केदार यांच्यासोबत गावातील हॉटेल सुमेरसिंग च्या मागच्या रोडने जात असतांना संशयित आरोपी राहुल बऱ्हाटे व निलेश ऊर्फ बाबा अहिरराव यांनी वाहन अडवले. मागील भांडणाच्या वेळेस संतोष कोळीने दिलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी शिवीगाळ करुन गाडीवरुन खाली पाडत बेदम मारहाण केली. राहुल बऱ्हाटेने त्याच्या कंबरेतून धारदार चॉपर काढून संतोष माळी यांच्या पाठीमागून कंबरेत चॉपरने वार करून दोघे फरार झाले होते.  याप्रकरणी संतोष कोळी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्ह्यातील दोन्ही आरोपी हे तालुक्यातील भोलाणे येथे असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, गोविंदा पाटील, योगेश बारी यांनी भोलाणे येथून संशयित आरोपी राहुल बऱ्हाटे व निलेश ऊर्फ बाबा अहिरराव यांन अटक केली. यातील राहुल बिऱ्हाडे यांच्या विविध गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.

 

Exit mobile version