Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बापरे : तरूणीवर चौघांचा अत्याचार; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील एका गावातील तरूणीवर चार जणांनी पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून या आरोपींना पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गजाआड केले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील एका गावात रहिवास असलेल्या तरूणीवर गफूर गबू तडवी याने २ जानेवारी रोजी दुपारी तिच्या घरात शिरून अत्याचार केला. याप्रसंगी त्याने तिला धमकी देऊन यावल येथे बोलावले. येथे अमोल शत्रुघ्न कोळी, पंकज बुधा कुंभार आणि प्रतीक राजेंद्र कोळी या तीन जणांनी धमकावत तिच्यावर अत्याचार केले. ४ रोजी रात्री ही घटना घडली.

यानंतर पिडीत तरूणीने पोलीस स्थानक गाठून फिर्याद दिली. या अनुषंगाने गफूर गबू तडवी ( वय ३३); अमोल शत्रुघ्न कोळी (वय २३); पंकज बुधा कुंभार ( वय २६ ) आणि प्रतीक राजेंद्र कोळी ( वय २० ) या चौघांच्या विरूध्द अडावद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास अडावद पोलीस स्थानकातील सपोनि गणेश बुवा हे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Exit mobile version