Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा शहर खड्डेमुक्त करा : शिवसेनेची मागणी

chopda shivsena

चोपडा प्रतिनिधि । शहरातील रस्ते खड्डेमुक्त करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी शिवसेना व युवासेनेतर्फे एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांबाबत शिवसेनेने निवेदन दिले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्प हार अर्पण करून घोषणा देत चोपडा नगरपरिषदेत ठिय्या आंदोलन करून मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले. यात नमूद केले आहे की, जुना शिरपुर रस्त्यावर मोठया प्रमाणात गड्डे पडले असुन त्या रस्त्यावर खड्डे की ? खड्डया रस्ता अशी परिस्थिती आहे. या रस्त्यावर पायी फिरणार्‍यांची वर्दळ असते. यातच मोटारसायकल अपघात होत असतात. तसेच शहरातील मुख्य रस्ते गटारी नादुरुस्त झाले आहेत. कॉलनी परिसातील गटारी भरल्या असुन कोणीही कर्मचारी पाहायला तयार नाहीत. या सर्व बाबींचे निराकरण करण्यात यावे अशी मागणी यात करण्यात आली आहे.

याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, शहर प्रमुख आबा देशमुख, पंचायत उपसभापती एम.व्ही पाटील, पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख विकास पाटील, नगरसेवक गट नेते भैया पवार, किशोर चौधरी, महेंद्र धनगर, राजाराम पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र जैस्वाल, युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक चौधरी, संतोष अहिरे, प्रा. शरद पाटील, युवासेना शहर संघटक नंदु गवळी, शिवसेना उप शहर प्रमुख वासुदेव महाजन, प्रविण जैन, सुनिल बरडीया, भरत साळुंखे, भुषण चौधरी, शिवसेना विभाग प्रमुख विजय देशमुख, शाखाप्रमुख शरद पाटील, विपिन जैन, दिपक माळी, प्रताप माळी, प्रशांत पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते मुख्याधिकार्‍यांनी या निवेदनाची दखल घेत तात्काळ निराकरण करण्याचे आश्‍वासन दिले.

Exit mobile version