Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गावठी कट्टयासह एकाला अटक

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील उमर्टी ते लासूर रस्त्यावर गावठी कट्टयासह एका तरूणाला अटक करण्यात आली आहे.

तालुक्यातील उमर्टीसह परिसरात गावठी कट्टयांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. या अनुषंगाने पोलिसांचे पथक देखील सातत्याने घडामोडींवर लक्ष ठेवून असते. दरम्यान, नाशिक येथील विशेषष पोलिस महानिरीक्षकांचे पथक व चोपडा ग्रामीण पोलिसांना एक जण हा गावठी कट्टयासह येत असल्याची माहिती मिळाली होती.

या गुप्त माहितीच्या आधारे, पोलिसांनी ३० हजार रुपयांच्या गावठी कट्ट्यासह संशयित वसीम सुलतान शेख (रा.मानखुर्द, मुंबई) याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या डाव्या खिश्यात, ३० हजार किंमतीचा स्टीलचा गावठी बनावटीचा कट्टा मॅगझीनसह आढळून आला. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने हा कट्टा गुरुदेवसिंग उर्फ खटका लिवरसिंग बडोले (रा.पार उमर्टी, ता.वरला, जि.बडवाणी) यांच्याकडून घेतल्याचे त्याने सांगितले. ही कारवाई पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांनी सहकार्‍यांसोबत केली.

Exit mobile version