Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपड्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त आजी-माजी सैनिकांचा गौरव

chopda maji sainik satkar

चोपडा प्रतिनिधी । यशोधन चॅरीटेबल ट्रस्टतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अखंड मुनिदास स्वामी आणि शास्र नयनदास स्वामी यांच्या शुभहस्ते भारतीय लष्करातील जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरवातीस आदरणीय अखंड मुनिदास स्वामी व जेष्ठ माजी सैनिक धनसिंग पाटील यानी भारत मातेचे पूजन करत व शास्त्र नायनदास स्वामी यानी मंत्रोच्चार करत भारतीय ध्वजाला सलामी दिली. जिल्हाभरातील आजी-माजी सैनिक लक्ष्‍मण महाजन, प्रभाकर माळी, उमेश चौधरी, नामदेव राजपूत, रविंद्र शिंदे, किशोर पाटील, सुनील सोनार, संदीप पाटील, धनसिंग पाटील यांचा स्वामी नारायण परिवारातील संत यांच्या पावन हातून सन्मान करून गौरव करण्यात आला.

देशाच्या विकासासाठी अखंड प्रयत्न करा – मुनिदास स्वामी
याप्रसंगी यशोधन चॅरीटेबल ट्रस्ट अध्यक्ष डॉ.राहुल पाटील,वि.के.पाटील (नंदुरबार) आप्पासो रामदास पाटील,डॉ.तृप्ती पाटील प्राचार्या परमेश्वरी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी अखंड मुनिदास स्वामी यांनी देश अखंड राहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे व राष्ट्रहिताचे संस्कार हे लहान पणातच या बालगोपालांना दिले तर हा आपला देश नक्कीच उद्याचा सर्वांगीण दृष्टया महान देश होईल असा विश्वास व्यक्त केला.

तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांनी आजचा स्वतंत्रदिन हा आपल्या सर्व भारतियांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. कारण आज आपला देश खऱ्या अर्थाने अखंड झाला आहे. आज संपूर्ण भारतात एक देश, एक निशान, एक संविधान झाले आहे, जम्मू काश्मीर मधील ३७० कलम व (३५अ) रद्द करून संपूर्ण देश म्हणून खरा स्वातंत्र्यदिन संपूर्ण भारतात आज साजरा होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. या कार्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृह यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडून देशातील सरकारचे आभार व्यक्त केले.

आजी-माजी सैनिकांचा परीवारासह सत्कार
यावेळी भारतातील शहीद सैनिक कुटुंबांसाठी व लष्करातील आजी माजी सैनिक व त्यांच्या परिवारसाठी सामाजिक बांधिलकीतुन त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची तपासणी फी न घेण्याची व तसेच वैद्यकीय खर्चात 50 टक्के सूट देण्याचे यावेळी जाहीर केले तसेच भविष्यात शहीद कुटुंबातील गरजु विद्यार्थिसाठी आर्थिक मदत उभी करण्याचा निश्चय याठिकाणी व्यक्त केला.

विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे सादरीकरण
कार्यक्रमात लहान विद्यार्थ्यांनी व शाळेतील शिक्षिकांनी सर्व सैनिकांना राख्या बांधून भारतीय स्वातंत्र्य दिनासोबत रक्षाबंधन हा भारतीय सण साजरा केला. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आर्किड इंटरनॅशनल स्कूलच्या बालकलाकारांनी विविध देशभक्तीपर गीत सादर केले. इयत्ता २ री विद्यार्थ्यांनी ‘संदेशे आते है’ या गीतावर नृत्य सादर केले. तसेच ‘ये वतन वतन मेरे वतन’ हे सामूहिक गीत सादर केले. इयत्ता पहिली व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर ड्रामा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

बालकांना जिंकली उपस्थितांची मने
यानिमित्ताने बाल देशभक्तांनी आपल्या देशप्रेम आपल्या शब्दसुमनांनी व्यक्त केले. यात वैष्णवी जाधव, हर्षल पाटील, आर्या पाटील, अथर्व लवटे, ईशानी जैन, हिरल जाधव, शौर्या पाटील, नियती पाटील, आदित्य जैन, चेतना पाटील, भावेश पाटील तसेच बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी फॅन्सीड्रेस स्पर्धेत सहभाग नोंदवला. यात विनीत पाटील, आराध्या पाटील, दर्शन पाटील, शाफिया कच्ची, रियांश लेंगे, कर्मन्य पाटील, ध्रुव पाटील, सौम्या पावरा, कनिष्ठ जैन, आचल बारेला इत्यादिंनी भाग घेऊन उपस्थितांची मने जिंकली. सुनील सोनार यांनीही लहानमुलांनी देशभक्तांना भारतीय लष्कराच्या कार्याबद्दल माहिती दिली. नितेश वाघ यांनी सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन दिपाली पाटील यांनी केले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रद्धा देशमुख, लिपिका नागदेव, रिया कलानी, सपना पवार, अनीता पवार, दिनेश नाथबुवा, नरेंद्र पवार यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version