Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत चोपडा महाविद्यालयाला यश

chopada clg 1

 

चोपडा प्रतिनिधी | येथील म. गांधी शिक्षण मंडळ संचलित कला शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळतर्फे स्व. बाबासाहेब नारखेडे यांच्या स्मृतीदिनानिमीत्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा नुकतीच घेण्यात आली असून यास्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकविला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, म. गांधी शिक्षण मंडळ संचलित कला शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी स्पर्धे सहभागी होऊन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भाग्येश सोनवणे आणि कुणाल सोनवणे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश जी.पाटील, अध्यक्ष अॅड संदीप पाटील, उपाध्यक्षा आशा पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, प्राचार्य डॉ.डी.ए.सुर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, डॉ.के.एन.सोनवणे, डॉ.व्ही.टी.पाटील, प्रा.एन.एस.कोल्हे, ज्यु कॉलेज उपप्राचार्य प्रा.बी.एस हळपे, पर्यवेक्षक प्रा.व्ही.वाय.पाटील, रजिस्ट्रार डी.एम. पाटील आणि इतर शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आणि पुढील भाविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version