Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोसाका भाडे तत्वावर देण्यास भागधारकांची एकमुखाने मंजुरी

चोपडा प्रतिनिधी । चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना अर्थात चोसाका भाडेतत्वावर देण्यासाठी सर्वसाधारण बैठकीत एकमुखाने मंजुरी देण्यात आली.

गेल्या दोन हंगामापासून बंद असलेला चोपडा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आले आहेत. या अनुषंगाने रविवारी कारखान्याची सर्वसाधारण बैठक भागधारक आणि शेतकर्‍यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.

या सभेला चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे, शेतकी संघाचे चेअरमन दुर्गादास पाटील, दूध संघाचे संचालक अशोक चौधरी, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य इंदिराताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य दिलीप पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य संभाजी पाटील, शांताराम पाटील, पं.स. माजी सभापती आत्माराम म्हाळके, जगन्नाथ पाटील, चंद्रशेखर पाटील, चोसाका संचालक आनंदराव रायसिंग, प्रवीण गुजराथी, प्रा. भरत जाधव, भरत पाटील, गोपाळ धनगर, विजय पाटील, नीलेश पाटील, अनिल पाटील, जितेंद्र पाटील, कार्यकारी संचालक अकबर पिंजारी, पी.बी. पाटील आदी उपस्थित होते.

याप्रसंगी चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना २५ वर्षे भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी चोपडा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी सर्वसाधारण सभेत हात उंचावून ठरावास एकमताने सहमती दिली. चोसाका भाडेतत्त्वावर देण्याचे टेंडर निघाल्यावर शेतकर्‍यांचे थकीत ६०० रुपयांपैकी ३०० रुपये खात्यात जमा होतील, त्यानंतर उर्वरित ३०० रुपये शेअर भागभांडवलात जमा होतील, असे आश्‍वासन यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन घन:श्याम पाटील यांनी उपस्थित शेतकर्‍यांना दिले.

Exit mobile version