Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलीस कोठडीत संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पोलीस कोठडीत असणार्‍या संशयिताने हाताचा नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चोपडा शहर व अमळनेरात घरफोड्या करणारा, नंदुरबार येथील संशयित जिम्मी उर्फ दीपक विपिन शर्मा (वय २९) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्याला पुढील चौकशीसाठी चोपडा पोलीस स्थानकाच्या स्वाधीन करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत असताना, मंगळवारी दिनांक १२ रोजी सायंकाळी संशयिताने धारदार वस्तूने हाताच्या नसा व गळा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे पोलीस स्थानकात खळबळ उडाली. यानंतर त्याला चोपडा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, संशयित दीपक विपिन शर्मा हा नंदुरबार येथील सराईत गुन्हेगार असून त्याने आतापर्यंत देशात वेगवेगळ्या ५० ठिकाणी गंभीर गुन्हे केले आहेत. तो घरफोड्या करून विमानाने प्रवास करून चैनीत पैसे उडवत असल्याचे चौकशीत आढळून आले होते. यातच त्याने पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

Exit mobile version