Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपहार करणारा बँकेचा कॅशियर गजाआड

चोपडा प्रतिनिधी | येथील बँकेतील कॅशियरने सव्वाचार लाख रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, येथील एचडीएफसी बँकेत कॅशियर म्हणून काम करणार्‍या जयेश संतोष बडगुजर याला पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील गुजराती गल्लीतील रहिवासी हर्षदा कमलेश शहा (वय ६०) यांच्याकडून २ ते ९ ऑगस्ट दरम्यान वेळोवेळी, एचडीएफसी बँकेतील कॅशियर जयेश संतोष बडगुजर (वय २५) याने पैसे घेतले. बँकेतील खात्यावर लिंक असलेले एटीएम कार्ड बंद करण्यासाठी फिर्यादी हर्षदा शहा यांच्याकडून संशयिताने रोख दीड लाख रुपये घेतले. त्यानंतर वेळोवेळी रोख रक्कम घेऊन बँकेत प्रत्यक्ष जमा न करता गैरव्यवहार केला.

यासोबत जयेश संतोष बडगुजर याने फिर्यादीच्या नावे असलेले एटीएम कार्डचा व खाते क्रमांकाचा गैरवापर करून बँक खात्यातील ३ लाख ६५ हजार रुपयांसह एकूण ४ लाख १५ हजार रुपयांचा अपहार केला. यामुळे त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Exit mobile version