Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलिसांना धक्का-बुक्की करणार्‍याची कोठडीत रवानगी

चोपडा प्रतिनिधी | नाकाबंदीच्या दरम्यान पोलिसांना धक्काबुक्की करणार्‍या चारचाकी वाहन चालकाची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

या संदर्भात माहिती अशी की, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ३१ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिस प्रशासनाने नाकाबंदी केली होती. यात पोलिस निरीक्षक अवतातसिंग चव्हाण हे आपल्या सहकार्‍यांसह वाहनधारकांची तपासणी करत होते. या नाकाबंदीच्या दरम्यान पोलिसांनी सतीश सोमा वाडे ( रा. तारामती नगर, चोपडा ) याला त्याच्या एमएच १४ एपी १८९१ क्रमांकाच्या फियाट कारची कागदपत्रे मागितली.

यावरून सतीश वाडे याने पोलिसांशी हुज्जत घालत धक्का-बुक्की केली. यानंतर याने सहायक पोलिस निरीक्षक अजित साबळे यांच्या छातीत लाथ मारून ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करून वर्दी उतरवण्याची धमकी दिली. यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.

या संदर्भात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून कॉन्स्टेबल सुमेर वाघरे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात सतीश वाडे विरुद्ध कलम ३५३, १८६, २९४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर वाडे याला चोपडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Exit mobile version