Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपड्यात अतिक्रमण विरोधात दोन महिलांचे आमरण उपोषण

 

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील नागलवाडी-वराड रस्त्यावरील चिंच चौकातील अहिल्याबाई होळकर शॉपिंग सेंटर परिसरात हॉटेल व टपरी धारकांनी अतिक्रमण केलेले आहे.त्यामुळे येथे दारू पिणारे तसेच सट्टा लावणाऱ्या लोकांचा वावर वाढला आहे. याच भागात सार्वजनिक शौचालय असून महिलांना येथे थांबणाऱ्या टारगट पोरांमुळे त्रास सहन करावा लागतो. अगदी या भागातून जाणाऱ्या विद्यार्थिनी आणि महिलांना वापरणे देखील मुश्किल झाले आहे. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यात यावे, यासाठी दोन महिलांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, चिंच चौकातील अहिल्याबाई होळकर शॉपिंग सेंटर परिसरात तरुण, दारू पिणारे तसेच सट्टा लावणारे लोकांच्या येथे बैठका असल्याने महिलांना वापरणे मुश्किल झाले आहे. काही दुचाकी चालक टारगट तरुण रस्त्यावर मोटर सायकल लावून मुली व महिलांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करतात. शौचालयास जाणा-या महिलांना पाहून अश्लील गाणे लावतात. यामुळे चिंचचौक भागातील नागरिक व महिला त्रस्त झाले असून याबाबत नगरपरिषदेकडे लेखी तक्रार केली होती. परंतु नगरपरिषदेने तक्रारीची साधी दखल सुद्धा घेतली नाही. म्हणून या भागातील रहिवाशी कविता धनगर व उरुसा खाटीक या दोघं महिलांनी चोपडा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज (दि. २४ जून) रोजी सोमवारीं सकाळी ८ वाजे पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान आज नगरपरिषदेचे पदाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन साधी चौकशी सुद्धा केली नाही. अशी तक्रार उपोषणकर्त्या कविता धनगर यांनी ‘लाईव्ह टेंड्रस् न्यूज’शी बोलतांना सांगितले आहे.

 

याबाबत अतिक्रमणधारक व स्थानिक रहिवाशी यांच्यात यापूर्वी अनेकदा भांडणे देखील झालेले आहेत. त्यामुळे शांततेचा भंग होण्याची शक्यता असून चिंचचौक परिसर अतिसंवेदनशील बनला आहे. तर यापूर्वी चौक परिसरात हिंदू-मुस्लिम समुदायामध्ये दंगली उसळली आहेत. अतिक्रमण काढून टाकणे संदर्भात कविता धनगर यांनी (दि. ३० ऑक्टोबर २०१८) रोजी नगरपरिषदेकडे लेखी तक्रारी दिली होती. परंतू तक्रारी अर्जाची नगरपरिषद प्रशासनाने साधी दखल सुद्धा घेतली नाही. म्हणून (१७ जून २०१९) पर्यंत अतिक्रमण काढण्याचा अल्टीमेंटम देण्यात आला. मात्र नगरपरिषदेने कोणतीही कार्यवाही केली नसल्याने चिंचचौक भागातील रहिवाशी कविता धनगर व उरुसा खाटीक या दोघा महिलांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज (दि.२४ जून) रोजी सोमवारीं सकाळी ८ वाजे पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान आज दिवसभर अनेकांनी उपोषणस्थळी भेट देऊन महिला उपोषणार्थींना पाठिंबा दिला आहे.

Exit mobile version