Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा येथे आशा गटप्रवर्तक संघटनेतर्फे विविध मागण्याचे निवेदन

nivedan

 

चोपडा प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयावर आशा गटप्रवर्तक संघटना कर्मचारीचा मेळावा आज दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयटकचे राज्य उपाध्यक्ष कामगार नेते कॉ. अमृतराव महाजन यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार पोळ यांना 17 मागण्याचे निवेदन देण्यात आले असून येत्या 9 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा परिषदवर एक दिवशीय लक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा ही यावेळी देण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आशा गटप्रवर्तक यांच्या मानधन वाढीचा आश्वासनप्रमाणे शासकीय आदेश (G.R) निघणे अत्यावश्यक झाले असून यावर आशा गटप्रवर्तक संघटना कृती समितीच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. आशांना तेलंगणा राज्याप्रमाणे किमान 10 हजार रू मानधन द्या, मानधनवाढीचा रखडवलेला जिआर काढावा, शहरातील आशांना वारंवार मिटींगला बोलवणे बंद करा, किमान 6 हजार रुपये पेंशन मिळावी, एकछत्री योजना अमलात आणणे, तसेच 1200रू स्टेशनरी खर्च मिळावा, शहरी आशांना ड्यूलीसचे पैसे मिळावे, आशांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा, स्कूटी-मोबाईल द्या, काम बंद केल्याची सूचना कागदपत्रे सादर करण्याआधी द्या, मे पासूनचा थकित मोबदला द्या, असा कर्मचा-यांच्या मागण्यात आहेत. आजपासून राज्यातील सर्व जिल्हात आशा गटप्रवर्तक चक्री उपोषणाला बसतील तसेच दि. ३ रोजी आरोग्य मंत्र्यांनी जर शासकीय आदेश (जी.आर) काढण्याचे लेखी पत्र दिले नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

लढाई अंतिम टप्प्यात आली असून त्या आंदोलनात भागीदारी करावी, असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी कॉ. अमृतराव महाजन करण्यात आले आहे. निवेदन देतांना शैला परदेशी, मीनाक्षी सोनवणे, संगिता पाटील, मनिषा पाटील, संजना विसावे, पल्लवी सोनवणे, अनिति पाटील, कल्पना महाले, ललिता भादले, योगिता कोळी, रेखा पाटील, भारती मोरे, विजया महाजन, संगिता मराठे, अंजना महाजन, शितल पाटील, संगिता पाटील, ज्योती चित्र, कथी विसावे, भारती माली, मिना चौधरी, फूलेबाई भिल, योगिता मिस्त्री, गायत्री जोशी, आदी उपस्थितीत होत्या.

Exit mobile version