Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपड्यात भरदिवसा महिलेची सोनसाखळी लांबवली

chain snatching 1454350449 835x547

 

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील अरुणोदय कॉलनीत एका वृद्ध महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी लांबविल्याची केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. भरवस्तीत दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेमुळे शहरातील महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

 

पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की ,दुपारी चार वाजेच्या सुमारास अरुणोदय कॉलनीत आपल्या घराच्या अंगणातील उषादेवी भास्कर पाटील (वय ६६) या बंगळीवर बसलेल्या होत्या. त्यावेळी मोटारसायकलस्वार दोन जणांनी त्यांना ‘यहां बच्चों का स्कूल कहाँ है?’ असे हिंदीतून विचारले. उषादेवी यांना त्यांचे बोलणे समजत नसल्याने उषादेवी पाटील या गेटजवळ आल्या. त्याचवेळी मोटारसायकलवर मागे बसलेल्या एका चोरट्याने गेटमधून हात टाकून उषाबाई यांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली. उषाबाई आरडा-ओरडा करणार तेवढ्यात चोरटे भरधाव वेगाने तिथून पसार झाले. चोरट्यांनी साधारण ५० हजार रुपये किमतीची वीस ग्रॅम वजनाची सोनसाखळी लांबविल्याने गावात एकच खळबळ उडाली होती.

उषादेवी पाटील यांनी चोरट्यांना पाहिल्या नुसार ते गोरे गोमटे असून अंगावर काळे टी शर्ट आणि जीन्स पँट घालून स्पोर्ट शूज पायात होते. त्यांच्याकडील मोटारसायकलीचा रंग काळसर असल्याचे त्यांनी सांगीतले. घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक श्री. अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेची माहिती जाणून घेतली. ऊषादेवी भास्कर पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Exit mobile version