Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चांदसर येथे रिक्षाच्या धडकेत तरूण गंभीर जखमी

Accident

जळगाव प्रतिनिधी । जळगावला येण्यासाठी प्रवाशी रिक्षात बसतांना मागुन येणाऱ्या रिक्षाने जोरदार धडक दिल्याने पाय फॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे घडली. जखमी जळगावातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, नातेवाईकांना भेटल्यानंतर जळगाव येण्यासाठी रिक्षात बसत होते. त्याच क्षणी मागून येणाऱ्या प्रवाशी रिक्षाने जोरदार धडक दिल्याने विशाल पवार हे गंभीर जखमी झाले. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून जळगावातील खासगी इस्पितळात दाखल केले आहे. हा अपघात धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील रिक्षा स्टॉप येथे दुपारी 12.30 वाजता घडला.

Exit mobile version