Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चित्रा वाघ यांचे प्रमोशन ! : मिळाली ही जबाबदारी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांनी अलीकडच्या काळात अतिशय प्रखरपणे पक्षाची बाजू मांडून विरोधकांना पेचात पकडण्याचे काम केले आहे. याचमुळे त्यांना हे अतिशय महत्वाचे पद प्रदान करण्यात आले आहे. . यापूर्वी उमा खापरे यांनी भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे.

चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यांनी विविध प्रकरणे लाऊन देखील धरले होते. यात पूजा चव्हाण प्रकरणातही चित्रा वाघ यांनी तत्कालिन मविआ सरकारचे मंत्री संजय राठोड यांच्यावर त्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. या आरोपांमुळे राठोडांना मंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.

Exit mobile version