Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिराग पासवान यांचा भाजपा उमेदवारांना पाठिंबा

पाटणा वृत्तसंस्था -बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोक जनशक्ती पार्टीनं मतदान काही दिवसांवर असताना भाजपा उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. लोजपाचं अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहारच्या मतदारांना तसं जाहीर आवाहन केलं आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच चिराग पासवान यांनी ट्विट करत नितीश कुमार यांना आव्हान दिलं आहे. तर आपण भाजपासोबतच असल्याचंही स्पष्ट केलं आहे. “आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की, ज्या ठिकाणी लोजपाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्या सर्व ठिकाणी बिहार प्रथम, बिहारी प्रथम लागू करण्यासाठी लोजपा उमेदवारांना मतदान करावं व अन्य ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान करावं. येणारं सरकार नितीशमुक्त सरकार बनेल,” असं आवाहन चिराग पासवान यांनी समर्थकांसह मतदारांना केलं आहे. चिराग पासवान यांनी केलेल्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा भाजपा-लोजपातील छुप्या युतीच्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात लोजपाचे उमेदवार नाहीत. तिथे भाजपा उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन चिराग पासवान यांनी लोजपा समर्थकांसह मतदारांना केलं आहे.

Exit mobile version