वरणगावात आजपासून बालकांना मिळणार ‘न्यूमोकोकल’ लस (व्हिडीओ)

वरणगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय लसीकरण अभियानात न्युमोकोकल म्हणजेच पीसीव्ही लसीचा समावेश करण्यात आला आहे. आजपासून भुसावळ तालुक्यातील वरणगाव ग्रामीण रुग्णालयात न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन मोफत देण्यात येत आहे.

या लसीकरणाचे उद्घाटन माजी नगरसेविका मालतीताई मेढे यांच्या हस्ते करण्यात आले आज या लसीकरणाच्या दोन वाईल्स ग्रामीण रूग्णालयांमध्ये उपलब्ध झाले आहेत ही लस लहान मुलांसाठी मोफत उपलब्ध झाली आहे या लसीमुळे लहान मुलांना निमोनिया हा आजार होणार नाही या उद्घाटन प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर क्षितीजा हेंडवे  डॉ अविनाश सुरवाडे कामगार नेते मिलिंद मेढे अधिपरिचारिका सुनीता केदारे अर्चना वासनिक पल्लवी सुरवाडे शितल बोदडे प्रीती आराख मोहिनी सपकाळे प्रयोगशाळा तंत्रज्ञ भोजराज लोखंडे सहाय्यक दिलीप गायकवाड वरिष्ठ लेखापाल महेंद्र सोनवणे कनिष्ठ लेखापाल आकाश इंगळे एक्स-रे टेक्निशियन उदय बोंडे व आय सी टी सी कर्मचारी आणि आर बी एस के ,आर के एस के कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय सी टी सी च्या समुपदेशक ज्योती गुरव यांनी केले

 

Protected Content