Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विषारी औषध घेतलेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बाभुळगाव येथील १७ वर्षीय मुलाने विषारी औषध घेतल्याने त्याच्यावर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शनिवारी ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करणत आली आहे. रूपेश ज्ञानेश्वर पाटील (वय-१७) रा. बाभूळगाव ता.धरणगाव असे मयत मुलाचे नाव आहे.

रूपेश पाटील हा मुलगा आपल्या परिवारासह धरणगाव तालुक्यातील बाभूळगाव येथे वास्तव्याला होता. ३० जुलै रोजी त्याने काहीतरी विषारी औषध सेवन केले होते. त्याला अस्वस्थ वाटल्यानंतर त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी त्याच्यावर उपचार सुरू असतांना पहाटे सव्वा तीन वाजता त्याची प्राणज्योल मालविली. याप्रकरणी शनिवारी ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक पाटील करीत आहे.

Exit mobile version