Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात लवकरच बालकुमार साहित्य संमेलन

sahitya mandal

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर नोंदणीकृत सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या 16व्या वर्धापनदिनानिमीत्त येत्या नोव्हेंबर महिन्यात नामवंत लेखक डॉ. सुरेश सावंत (नांदेड) यांच्या अध्यक्षतेखाली सूर्योदय बालकुमार मराठी साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या संमेलनात ज्या बालकविता लिहिणा-या कवींना कविसंमेलनात कविता वाचन करू ईच्छित असणा-या कवींनी आपल्या दोन कविता दि. २५ सप्टेंबर पर्यंत रजिस्टर टपालाने सतीश जैन, अध्यक्ष सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ, माँ. प्लाट नं-३१, गट नं-२/२ ब. शिंदे नगर, पिंप्राळा, जळगाव ४२५००२ (खानदेश) या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन मंडळाचे सचिव डी.बी. महाजन, सल्लागार साहेबराव पाटील, उपाध्यक्ष प्रवीण लोहार यांच्यासह खानदेशातील जिल्हा व तालुकाध्यक्ष यांनी केले आहे. तसेच सहभागी कवींना गौरवपत्र देण्यात येणार असून सहभागासाठी कुठल्याही प्रकारचे प्रवेशशुल्क आकारण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Exit mobile version